adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्रीरामपूर मानाचा गणपती आझाद मैदान उत्सवाच्या अध्यक्षपदी यश गौतम बोरावके यांची निवड

 श्रीरामपूर मानाचा गणपती आझाद मैदान उत्सवाच्या अध्यक्षपदी यश गौतम बोरावके यांची निवड  श्रीरामपूर / प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  ...

 श्रीरामपूर मानाचा गणपती आझाद मैदान उत्सवाच्या अध्यक्षपदी यश गौतम बोरावके यांची निवड 


श्रीरामपूर / प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 महाराष्ट्रात नावाजलेला व मानाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या आझाद मैदान गणपती मंडळाच्या नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी युवा उद्योजक यश गौतम बोरावके, कार्याध्यक्षपदी सुप्रसिद्ध डॉक्टर दिलीप शिरसाठ, तर खजिनदारपदी प्रगतशील शेतकरी सूर्यकांत सगम यांची निवड करण्यात आली आहे. 

श्रीरामपूर तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्व.जयंतराव ससाणे यांनी पुढाकार घेऊन आझाद मैदान येथे गणपती उत्सवाला भरीव मदत केली. मंडळाच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक वारसा जोपासला गेला त्याच पावलावर पाऊल ठेवत नगराध्यक्ष करण ससाणे यांनी देखील यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये पुढाकार घेत सक्रिय सहभाग घेतला आहे.

    यावर्षीच्या गणपती उत्सवासाठी नुकतीच मंडळाची बैठक संपन्न झाली यावेळी मंडळाचे पदाधिकारी मनोज नवले, सोमनाथ महाले, निलेश शिरसागर, प्रमोद पत्की, सुनील शेळके, कुणाल करंडे, चंद्रकांत वाकचौरे, कुणाल बोरावके आदि पदाधिकारी उपस्थित होते. 

   मंडळाची नव्याने कार्यकारणी गठीत केली असून कार्यकारणी मध्ये नगरसेवक सिद्धार्थ फंड, अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक नीरज मुरकुटे, तालुका अध्यक्ष प्रमोद भोसले, बिबवे अण्णा, विनीत कुंकुलोळ, हितेश धाडीवाल, प्रवीण बोंबले, सरबजीत सिंग चूग, प्रतीक बोरावके, सिद्धार्थ सोनवणे, करण झंवर, संजय गोसावी, प्रवीण फरगडे, अक्षय सगम, गौतम साबद्रा, गुंजन आहुजा, परेश गाडेकर आदींची निवड करण्यात आली आहे. यावर्षी देखील गणेश उत्सव काळात संस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी श्रीरामपूरवासियांना मिळणार आहे.

-----------------------------------------------

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

श्रीरामपूर - 9561174111

No comments