adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्रीकांत अशोक पाटील यांची छावा ग्रुप पोलीस मित्र संघाच्या चोपडा तालुका उपाध्यक्षपदी निवड

 श्रीकांत अशोक पाटील यांची छावा ग्रुप पोलीस मित्र संघाच्या चोपडा तालुका उपाध्यक्षपदी निवड   अशोक कोळी चोपडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोप...

 श्रीकांत अशोक पाटील यांची छावा ग्रुप पोलीस मित्र संघाच्या चोपडा तालुका उपाध्यक्षपदी निवड 


 अशोक कोळी चोपडा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा : छावा ग्रुप पोलीस मित्र संघ (महाराष्ट्र राज्य) यांच्या चोपडा तालुका कार्यकारिणीत श्रीकांत अशोक पाटील यांची चोपडा तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. छावा ग्रुप पोलीस मित्र संघ ही सामाजिक कार्याच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने कार्यरत असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले. महिलांवरील अत्याचार रोखणे, पोलीस व सामान्य नागरिकांमधील विश्वास वाढवणे, ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी जनजागृती करणे तसेच जनसामान्यांवरील अन्याय व अत्याचाराविरोधात कार्य करणे, हे संघटनेच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश अण्णा फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जळगाव जिल्हाध्यक्ष धनराज भाऊ उमरे, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष हितेश भाऊ मराठे आणि चोपडा तालुका अध्यक्ष पत्रकार ललित कोळी यांच्या नेतृत्वाखाली चोपडा तालुक्यात सामाजिक उपक्रमांना चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. श्रीकांत अशोक पाटील यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करताना, त्यांनी संघटनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि पोलीस प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा शुभेच्छा उपस्थितांनी दिल्या. “एकच ध्येय – सेवा, सुरक्षा आणि समाजाचा विश्वास!” या ध्येयाने संघटनेचे कार्य पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

शुभेच्छूक 

  पत्रकार ललित कोळी, चोपडा तालुका अध्यक्ष, छावा ग्रुप पोलीस मित्र संघ व इ.मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या 

No comments