adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

किल्ले चौगावचे भाग्य कधी उजळणार ? स्थानिक दुर्गप्रेमींचा सवाल

  किल्ले चौगावचे भाग्य कधी उजळणार ? स्थानिक दुर्गप्रेमींचा सवाल   विश्राम तेले चौगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड)   चौगाव येथील किल्ले चौगाव...

 किल्ले चौगावचे भाग्य कधी उजळणार ? स्थानिक दुर्गप्रेमींचा सवाल  


विश्राम तेले चौगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

  चौगाव येथील किल्ले चौगाव या किल्ल्यास राज्य संरक्षित स्मारक म्हणून मान्यता मिळावी तसेच किमान  'ब' दर्जाचे पर्यटन स्थळ घोषित करण्याची मागणी सध्या जोर धरत आहे.

     अनेक वर्षांपासून स्थानिक दुर्गसेवक आणि इतिहास अभ्यासक या किल्ल्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत. वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. किल्ले चौगावला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या इतिहास विषय गटाचे सदस्य, स्थानिक इतिहास अभ्यासक  प्रा.पंकज प्र.शिंदे तसेच चौगाव वन व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष,उपाध्यक्ष स्थानिक इतिहासप्रेमी विश्राम तेले, चौगाव येथील ग्राम पंचायत प्रशासन, तसेच वनविभागाच्या वतीने  वेळोवेळी शासनाकडे मागणी केली जाते. 

        सातपुडा पर्वतरांगांतील निसर्गरम्य वातावरण, ऐतिहासिक वारसा आणि पावसाळ्यात खुलणारे अप्रतिम सौंदर्य यामुळे वर्षा ऋतूमध्ये चौगाव किल्ल्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. मात्र, आवश्यक पायाभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय आणि मार्गदर्शक सुविधा यांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. किमान या सुविधा तरी पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी वेळोवेळी प्रशासनाकडे केलेली आहे.

      चौगाव किल्ल्यास राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाल्यास या ऐतिहासिक वारशाचे शास्त्रीय संवर्धन व जतन होईल. तसेच 'ब' दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून मान्यता मिळाल्यास शासनामार्फत आवश्यक पर्यटन सुविधा विकसित करता येतील. त्यामुळे पर्यटनवृद्धी होईल आणि या ऐतिहासिक गडकोटाचा वारसा पुढील पिढ्यांसाठी अधिक प्रभावीपणे जतन केला जाऊ शकेल, त्यामुळे या किल्ल्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी इतिहास अभ्यासक प्रा पंकज प्र शिंदे, विश्राम तेले, राजा शिवछत्रपती दुर्गसंवर्धन परिवार, शिवशंभू प्रतिष्ठान आणि दुर्गसेवकांनी केली आहे.

------------------------------------------------------------------

प्रतिक्रिया :

किल्ले चौगावच्या संवर्धनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून झटत आहोत, काळाच्या ओघात उपेक्षित राहिलेल्या किल्ले चौगावला उजेडात आणण्यात आता यश मिळाले आहे पण या किल्ल्याचे शासकीय आणि शास्त्रीय पद्धतीने संवर्धन होईल तेव्हाच खरे यश मिळेल. तोपर्यंत दुर्गसेवकांची दुर्गसेवा सुरूच राहील, प्रशासनानेही सहकार्य करत पाठिंबा द्यावा एवढीच अपेक्षा... पंकज प्र.शिंदे, दुर्गसेवक,स्थानिक इतिहास अभ्यासक

No comments