adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आरोग्य विभाग डेंग्यू प्रतिरोध महिना कार्यक्रम प्राथमिक उपकेंद्र मोरव्हाल याच्या कडून गावात विवीध कार्यक्रम किटकजन्य आजार सर्वेक्षण व डेंग्यू प्रतिरोध महिना करण्यात आला.

  आरोग्य विभाग डेंग्यू प्रतिरोध महिना कार्यक्रम;   प्राथमिक उपकेंद्र मोरव्हाल याच्या कडून गावात विवीध कार्यक्रम किटकजन्य आजार सर्वेक्षण व डे...

 आरोग्य विभाग डेंग्यू प्रतिरोध महिना कार्यक्रम;  प्राथमिक उपकेंद्र मोरव्हाल याच्या कडून गावात विवीध कार्यक्रम

किटकजन्य आजार सर्वेक्षण व डेंग्यू प्रतिरोध महिना करण्यात आला. 


 मुबारक तडवी रावेर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर सर व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अमोल भंगाळे व लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ कीर्ती भामरे मॅडम डॉ.रिजवान शेख सर आरोग्य सहाय्यक श्री महेमुद तडवी, श्री ङि के नमायते आरोग्य निरिकक्ष यांच्या सूचनेनुसार* माझे गाव आरोग्य संपन्न होण्यासाठी जील्हा  परिषद शाळेत  आरोग्य सेवक योगेश कापडणे यांनी  डेंग्यू आजाराविषयी जनजागृति केली.समुदाय वैद्यकीय अधिकारी चेतन चिमणकर, आरोग्य सेवक  योगेश कापडणे   

बी एफ राठोड यांनी घरोघरी जाऊन कंटेनर सर्वेक्षण  करून पाणी साठविण्याची भांडी, टाक्या, कुलर, टायर, नारळाच्या करवंट्या, फुलदाण्या व इतर पाणी साचणाऱ्या वस्तींची तपासणी करून डासांच्या अळ्या आढळल्यास त्या तात्काळ नष्ट करण्यात आल्या. नागरिकांना डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.

आशा सेविकांनी घरभेटी घेऊन तापग्रस्त व्यक्तींची माहिती संकलित केली, नागरिकांना डेंग्यू प्रतिबंधाबाबत मार्गदर्शन केले तसेच स्वच्छता व डास नियंत्रणाबाबत जनजागृती करण्यात सक्रिय सहभाग नोंदविला

डेंग्यू प्रतिबंधासाठी घर व परिसर स्वच्छ ठेवा. पाणी साचू देऊ नका. पाण्याची भांडी झाकून ठेवा आठवड्यातून एक दिवस "ड्राय डे" पाळा ताप आल्यास त्वरित जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क साधा.

" स्वच्छ परिसर, निरोगी कुटुंब – डेंग्यूमुक्त गावासाठी सर्वांनी सहकार्य करूया."असा संदेश ग्रामस्थांना देण्यात आला.

 मोरव्हाल उपकेंद्र

 अंतर्गत , प्रा. आ. केंद्र लोहारा , ता. रावेर, जि. जळगाव

No comments