adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वन विभागाची धडक कार्यवाही बेकायदेशीर वनउत्पादन वाहतूक करणारी नॅनो कार व १००८ नग साग अनघड बेलन जप्त

  वन विभागाची धडक कार्यवाही बेकायदेशीर वनउत्पादन वाहतूक करणारी नॅनो कार व १००८ नग साग अनघड बेलन जप्त  विश्राम तेले चौगाव / इदू पिंजारी फैजपु...

 वन विभागाची धडक कार्यवाही बेकायदेशीर वनउत्पादन वाहतूक करणारी नॅनो कार व १००८ नग साग अनघड बेलन जप्त 


विश्राम तेले चौगाव / इदू पिंजारी फैजपुर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

काल दि.६/८/२९२६ रोजी पहाटे सुमारे 2.00 वाजल्यापासून गुप्त माहिती मिळाल्याने वन विभागाचे संपूर्ण गस्ती पथक वरगव्हाण ते लोणी( पंचक )रस्त्यावर दबा धरून बसले होते . सकाळी अंदाजे 6.50 वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाची नॅनो कार (वाहन क्र.MH.43.AJ.3132) संशयास्पदरीत्या येताना दिसली. वन कर्मचाऱ्यांची चाहूल लागताच वाहन चालकाने भरधाव वेगाने वाहन घेऊन पळ काढला.

त्यानंतर गस्तीपथकाने वाहनाचा पाठलाग केला असता संबंधित चालक वाहन साई मंदिराजवळील केळीच्या बागेत लपवून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला. वन कर्मचाऱ्यांनी सदर वाहन चालू करण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालू होत नव्हते नंतर वनक्षेत्रपाल अडावद यांच्या शासकीय वाहनाने सदर वाहन टोचन करून मुख्य विक्री केंद्र चोपडा येथे आणली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये एकूण 1008 नग साग अनघड बेलन आढळून आले. जप्त वाहन व वन उत्पादन ताबा पावती नुसार व पंचनाम्यानुसार एकूण नव्वद हजार एकशे आठ रुपये किंमतीची मालमत्ता मुख्य विक्री केंद्र, चोपडा येथे जमा करण्यात आले.

सदर प्रकरणी आवश्यक पंचनामा व इतर कायदेशीर कागदपत्रे तयार करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

 *सदरची कारवाई ही,* 

श्री.सौरिष सहाय सर 

म. उप वनसंरक्षक सो. यावल वन विभाग जळगाव,

 श्री. राजेंद्र सदगीर सर 

म.विभागीय वनाधिकारी सो.(दक्षता)धुळे 

श्री. एम. बी. पाटील सर 

म.सहायक वनसंरक्षक सो. चोपडा 

श्री. समाधान पाटील सर 

म. सहाय्यक वनसंरक्षक सो. यावल 

 *यांच्या मार्गदर्शना खाली* 

 श्री. महेश पाटील सर 

 म.वनपरिक्षेत्र अधिकारी सो.गस्ती पथक यावल 

श्री. के.एल. धनगर वनपाल ग.प यावल 

श्री. संजय पाटील वनपाल ग. प यावल 

श्री. सतीश वाघमारे वनरक्षक ग.प यावल.

श्री.आय .बी.चव्हाण वनरक्षक ग. प यावल.

श्री. एस . आर . तडवी पोलीस कॉन्स्टेबल ग.प यावल

यांनी केली.

No comments