adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

"विद्यार्थ्यांनी नशेला ठाम नकार द्यावा; उज्ज्वल भविष्यासाठी व्यसनमुक्तीचा संकल्प करा" – पोलीस उपअधीक्षक एस. आर. पाटील

 "विद्यार्थ्यांनी नशेला ठाम नकार द्यावा; उज्ज्वल भविष्यासाठी व्यसनमुक्तीचा संकल्प करा" – पोलीस उपअधीक्षक एस. आर. पाटील  विकास पाटी...

 "विद्यार्थ्यांनी नशेला ठाम नकार द्यावा; उज्ज्वल भविष्यासाठी व्यसनमुक्तीचा संकल्प करा" – पोलीस उपअधीक्षक एस. आर. पाटील 


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव : इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व आदर्श माध्यमिक विद्यालय, धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्ती अभियानांतर्गत अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करणे, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम समजावून सांगणे तसेच कायद्याविषयी माहिती देणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या  एस. एस. पाटील या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श माध्यमिक विद्यालयाचे संचालक आशिषकुमार पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक पोलीस उपअधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी (चोपडा विभाग)  एस. आर. पाटील यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत प्रभावी व सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी नशाबंदी अभियान, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे मानसिक, शैक्षणिक व सामाजिक परिणाम, पॉक्सो (POCSO) कायद्याची माहिती, वाहतुकीचे नियम, तसेच सायबर व सामाजिक पातळीवरील संभाव्य धोके याविषयी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. व्यसनापासून दूर राहून चांगले शिक्षण, सुसंस्कार आणि जबाबदार नागरिकत्व स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी दत्तात्रय बडगुजर (पोलीस उपनिरीक्षक, धरणगाव) तसेच पोलीस कॉन्स्टेबल सुमित बाविस्कर यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत कायद्याचे पालन, सुरक्षित जीवनशैली आणि सामाजिक जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्या  सुरेखा  पाटील यांनी पोलीस उपअधीक्षक एस. आर. पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला. यावेळी आदर्श माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे, उपमुख्याध्यापक ए. एस. पाटील, पर्यवेक्षिका बी. पी. (भारती) पाटील, दोन्ही विद्यालयांतील सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका भारती पाटील यांनी केले. सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक किरण चव्हाण यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ क्रीडा शिक्षक डी. एन. पाटील यांनी मानले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत व्यसनमुक्त, सुरक्षित आणि जबाबदार जीवन जगण्याचा संकल्प केला. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

No comments