adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निलंगा तालुक्यातील शिऊर–वळसांगवी शेतरस्त्यावरील पूल चार वर्षांपासून रखडला... शेतकऱ्यांचा संताप उसळला काम सुरू-बंदचा खेळ सुरूच..

  निलंगा तालुक्यातील शिऊर–वळसांगवी शेतरस्त्यावरील पूल चार वर्षांपासून रखडला... शेतकऱ्यांचा संताप उसळला काम सुरू-बंदचा खेळ सुरूच..     लातूर,...

 निलंगा तालुक्यातील शिऊर–वळसांगवी शेतरस्त्यावरील पूल चार वर्षांपासून रखडला...

शेतकऱ्यांचा संताप उसळला काम सुरू-बंदचा खेळ सुरूच.. 


   लातूर, जि. प्र. (उत्तम माने)

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

निलंगा तालुक्यातील शिऊर ते वळसांगवी – काटेजवळगा – आनंदवाडी  फाट्याला जोडणाऱ्या शेतरस्त्यावर उभारण्यात येत असलेला पूल मागील चार वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत पडून असल्याने परिसरातील शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे.  चार वर्षापूर्वी मोठ्या गाजावाजात सुरू झालेले हे बांधकाम आजतागायत पूर्ण न झाल्याने प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हा पूल शिऊर, वळसांगवी, काटेजवळगा व आनंदवाडी या चार गावांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या शेतरस्त्यावर आहे. 

या पुलामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्या-येण्यासाठी तसेच शेतमाल वाहतुकीसाठी मोठी सोय होणार होती. मात्र चार वर्षे उलटून गेल्यानंतरही काम अधांतरीच राहिल्याने शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी उन्हाळा आला की काही दिवस काम सुरू केले जाते आणि पावसाळा सुरू होताच काम बंद केले जाते.असा काम सुरू-बंदचा प्रकार गेल्या चार वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे पुलाचे बांधकाम पूर्ण होण्याऐवजी वर्षानुवर्षे रखडत चालले आहे.

पावसाळ्यात पुलाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने हा रस्ता पूर्णपणे बंद पडतो. परिणामी शेतकऱ्यांना शेतात जाणे-येणे अत्यंत कठीण होते. ऊसासह इतर शेतमाल वाहतूक, खत-बियाणे ने-आण तसेच जनावरांची ये-जा यावर मोठा परिणाम होत आहे. धनेगाव  डॅम च्या पाण्यामुळे अनेक महिने हा मार्ग बंद राहत असल्याने शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतावर जाण्यासाठी सुमारे पाच किलोमीटरचा मोठा फेरा मारावा लागत असल्याची तक्रार आहे.

मागील वर्षी या समस्येवर तात्पुरता उपाय म्हणून काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या खिशातून जवळपास ४० हजार रुपये खर्च करून पुलाजवळ खडक टाकून रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र पावसाळ्यात आलेल्या पाण्याने ते खडक वाहून गेल्याने शेतकऱ्यांचा सर्व प्रयत्न वाया गेला.

या पुलाचे काम नेमके कोणत्या विभागाच्या अखत्यारीत आहे आणि ते का रखडले आहे, याबाबतही स्पष्ट माहिती मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. स्थानिक पातळीवर हे काम महाराष्ट्र  वॉटर  रेस्कोर्स  डिपार्टमेंट च्या अखत्यारीत असल्याची चर्चा असली तरी अधिकृत स्तरावर याबाबत कोणतीही स्पष्टता करण्यात आलेली नाही.

दरम्यान,या प्रकरणी संबंधित कंत्राटदाराशी शेतकऱ्यांसमक्ष भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वीस वर्षांपासून संभाजी पाटील - निलंगेकर  हे निलंगा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र इतक्या महत्त्वाच्या शेतकऱ्याच्या  प्रश्नाकडे अद्याप लक्ष दिले गेले नसल्याची नाराजीही स्थानिक शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

चार वर्षांपासून रखडलेल्या या पुलामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून पुलाचे काम पूर्ण करावे, अन्यथा संबंधित विभागाविरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

No comments