ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीतून एकता सलोखा व सर्वधर्मसमभावाचा संदेश: मुबारक तडवी रावेर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) प्रेम, एकता, बंधुभाव आण...
ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीतून एकता सलोखा व सर्वधर्मसमभावाचा संदेश:
मुबारक तडवी रावेर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
प्रेम, एकता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देत ईद-ए-मिलादुन्नबी अर्थात प्रेषित हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या १५०१ व्या जन्मदिनानिमित्त रावेर , सावदा शहरासह परिसरातील गावांमध्ये भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत मुस्लिम समाजबांधवांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. मिरवणुकीतून एकता, बंधुभाव, सामाजिक सलोखा, हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि सर्वधर्मसमभावाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
सकाळी मुस्लिम बांधवांनी धार्मिक विधीपूर्वक फजरची नमाज अदा केल्यानंतर सकाळी ८ वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत ‘हैदरी’, सलाम, सलात व नात शरीफ यांसह धार्मिक घोषणा देण्यात आल्या. त्याचबरोबर सामाजिक एकता आणि बंधुभावाचा संदेशही देण्यात आला.
रावेर शहर तसेच तालुक्यातील गावांमधील प्रमुख मार्ग आणि चौकांमधून मिरवणूक मार्गक्रमण करत असताना सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी लंगर, मिठाई, विविध खाद्यपदार्थ तसेच महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
ईद-ए-मिलादुन्नबीचा हा सोहळा केवळ धार्मिक परंपरेपुरता मर्यादित न राहता सर्वधर्मसमभावाचे प्रत्यक्ष दर्शन घडविणारा ठरला. यावेळी विविध धर्मांचे नागरिक एकत्रितपणे सहभागी झाले. त्यामुळे शांतता, बंधुभाव आणि सामाजिक एकोपा टिकवून ठेवण्याचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.
मिरवणूक सुरळीतपणे पार पडावी यासाठी स्थानिक प्रशासन व पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नागरिकांनीही शांततेच्या मार्गाने सहभाग नोंदवत पोलिसांना व प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले.


No comments