लासुर येथे महाकाल गृप च्या वतीने भव्य रक्तदान शिबीर विश्राम तेले चौगाव/ चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) लासुर येथे क्...
लासुर येथे महाकाल गृप च्या वतीने भव्य रक्तदान शिबीर
विश्राम तेले चौगाव/ चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लासुर येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्ष व संत शिरोमणी सावता महाजन यांचे पुण्यतिथी निमित्ताने महाकाल गृप लासुरच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन माळी समाज मंगल कार्यालय लासुर येथे सकाळी ८:०० करण्यात आले होते. सदर शिबिर प्रसंगी क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र गुजरात मध्यप्रदेश तसेच क्षत्रिय माळी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष ए के गंभीर सर, उपाध्यक्ष नरेंद्र महाजन, सचिव किशोर माळी सर, सह सचिव नंदलाल माळी, लोकल ऑडिटर प्रकाश माळी, क्षत्रिय माळी समाज विकास मंडळाचे सर्व संचालक तसेव विविध संस्थाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. सदर शिबिरात लासूर व चौगांव येथील ८१ रक्तदात्यांनी रक्तदान देऊन सामाजिक जबाबदारी पार पाडली सदर शिबिरात उपस्थित रक्तदात्याना चहा व बिस्कीट साठी क्षत्रिय माळी समाज विकास मंडळाचे सचिव किशोर माळी सर व संचालक संजय महाजन यांनी सहकार्य केले. सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाकाल गृप चे अध्यक्ष पवन महाजन, उपाध्यक्ष साहेबराव मगरे, सचिव अमोल गंभीर, खजिनदार निलेश राजकुळे, सदस्य जितेंद्र महाजन, भुमेश्वर मगरे, प्रेमराज शेलकर, महेंद्र माळी, आर डी महाजन, महेश महाजन, विनोद मगरे, नितीन माळी, योगेश माळी,समाधान माळी, मनोज महाजन आदी यांनी मेहनत घेतली. सदर कार्यक्रमाचे आभार क्षत्रिय माळी समाज विकास मंडळाचे माजी सह सचिव अरुण महाजन यांनी मानले.

No comments