adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लासुर येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा

 लासुर येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा    विश्राम तेले चौगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) लासुर, ता. चोपडा : आंतरराष्ट्रीय आदिवासी द...

 लासुर येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा 


 

विश्राम तेले चौगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

लासुर, ता. चोपडा : आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनानिमित्त लासुर येथे आदिवासी समाज बांधवांच्या वतीने १० ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक उत्साह, संस्कृती व सामाजिक एकतेचे दर्शन घडवत आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी लासुर येथील लोकनियुक्त सरपंच नर्मदाबाई भिल यांच्या हस्ते आदिवासी समाजातील क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी व महापुरुष भगवान बिरसा मुंडा, खाज्या नाईक, तंट्या मामा भील व महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. किसान विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा उपसरपंच अनिल हिम्मतराव पाटील यांच्या हस्ते आदिवासी नामफलकाचे पूजन करण्यात आले.यानंतर आदिवासी समाज बांधवांनी बँड पथकासह गावातून भव्य शोभामिरवणूक काढली. या मिरवणुकीत आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला. पारंपरिक आदिवासी नृत्य, गाणी तसेच विविध आदिवासी अलंकारांनी मिरवणुकीची शोभा वाढवली. गावातील विविध चौकांमध्ये महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

बाजार चौकात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी आदिवासी समाज बांधवांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास आदिवासी समाजाचे अध्यक्ष बळीराम पावरा, अनिल पावरा, सुनील पावरा, सुभाष बारेला, भाईदास बारेला, पीकलाल बारेला, पिताराम बारेला तसेच ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र बारेला यांच्यासह आदिवासी समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदिवासी समाजाच्या समृद्ध परंपरा, संस्कृती, कला आणि महापुरुषांच्या विचारांना उजाळा देणाऱ्या या कार्यक्रमामुळे लासुर गावात आदिवासी दिनाचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला.

No comments