मालदाभाडी हायस्कूलात शालेय आरोग्य तपासणी. जामनेर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आरोग्य हेच सर्वात मोठे धन आहे त्याची काळजी घेतली प...
मालदाभाडी हायस्कूलात शालेय आरोग्य तपासणी.
जामनेर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आरोग्य हेच सर्वात मोठे धन आहे त्याची काळजी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. अनिता राठोड यांनी केले. न्यू इंग्लिश स्कूल मालदाभाडी शाळेत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम २०२६ अंतर्गत इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत आरोग्य तपासणी करण्यात आली. याच बरोबर नेत्र चिकित्सक अधिकारी डॉ. निकीता हजारे यांनी विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली.
यानंतर इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थीनींसाठी मासिक धर्म व आरोग्याची काळजी विषयावर विद्यार्थ्यांनींना मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्यदायी प्रश्नोत्तरी या चर्चासत्रात विद्यार्थीनींनी सहभाग घेतला व आपल्या समस्यांचे निरसन करुन घेतले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक एस आर शिकोकार हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून अरुण पवार विशेष शिक्षक शिक्षण विभाग पं.स. जामनेर हे होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय सैतवाल, यांनी केले, प्रास्ताविक श्रीमती के.आर. सुरवाडे यांनी केले तर आभार श्रीमती एस एस सोनवणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी जी. टी. पाटील, आर. एल कोळी, याच बरोबर ग्रीन आर्मी स्वयंसेवक ओम गावंडे, रोशन वंजारी, रोहन पारधी, हर्षल पालवे यांनी प्रयत्न केले.

No comments