फैजपूर येथील जि. प. उर्दू शाळा क्र. ३ मध्ये नगरसेवक हकीम तडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; विद्यार्थी, शिक्षक व ना...
स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांची मोठी उपस्थिती
![]() |
| फैजपूर येथे नगरपालिकेचे नगरसेवक हकीम तडवी यांच्याहस्ते ध्वजारोहण यावेळी मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते |
फैजपूर प्रतिनिधी – इदू पिंजारी
संपादक : हेमकांत गायकवाड
फैजपूर : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन फैजपूर शहरासह परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त फैजपूर येथील जि. प. उर्दू मुलांची शाळा क्रमांक ३ येथे स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी फैजपूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक तथा शहराच्या स्वच्छता विभागाचे सभापती आणि आरोग्य समिती सदस्य हकीम ऐमत तडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायले.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक शफीक सर, शिक्षक अझर सर, शहजाद सर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी साबीर शेख, मुशीर भाई, अजीम उद्दीन, रहीम भाई, जाकीर मेंबर तडवी, साजिद भाई, वहीद भाई यांच्यासह शाळेतील विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळाला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व सांगून देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण, शिस्त आणि राष्ट्रप्रेमाची भावना जोपासण्याचे आवाहन केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

No comments