एक एक झाडाला आईच्या मायेने जगवा - तेजस्वीनी आवड जामनेर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मालदाभाडी हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमात ...
एक एक झाडाला आईच्या मायेने जगवा - तेजस्वीनी आवड
जामनेर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मालदाभाडी हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमात जामनेर च्या वनपरिक्षेत्र अधिकारी तेजस्विनी आवड या बोलत होत्या. झाडाला आईच्या मायेने एक वर्ष वाढवा आयुष्यभर सुखाच्या सावलीनं ते परतफेड करतं, याच बरोबर त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे धडे देत मार्गदर्शन केले. सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र जामनेर व न्यू इंग्लिश स्कूल, मालदाभाडी शाळेत एक पेड माॅं के नाम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सामाजिक वनीकरण विभाग जामनेर व ग्रीन आर्मीच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड देऊन वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी पहिल्या टप्प्यात शंभर वृक्षांचे वाटप मालदाभाडी हायस्कूलात करण्यात आले. ग्लोबल वार्मींगवर मात करण्यासाठी विविध शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून वृक्ष वाटप व वृक्षारोपण करण्याचे कार्य सुरू आहे. असे वनपरिक्षेत्र अधिकारी तेजस्विनी आवड यांनी माहिती देऊन पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने या उपक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रीन आर्मी प्रमुख विजय सैतवाल यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक एस. आर. शिकोकार हे होते. तर प्रमुख अतिथी श्रीमती तेजस्विनी आवड, श्रीमती कविता ढसाळ,वनपाल जामनेर, श्रीमती वैशाली साळी वनपाल पहूर, वनरक्षक मारुती गाडेकर, अशोक ठोंबरे पहूर हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. एस. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती. के. आर. सुरवाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी ए. बी. पाटील, जी. टी. पाटील, आर. एल. कोळी, एम. एस. जैन यांच्या सह ग्रीन आर्मी स्वयंसेवक विराज जंगले, वैभव भोजने, ओम गावंडे, रोशन वंजारी, श्रावण अंभोरे , पारपोळ राधा, अंकिता नानोटे, यांनी प्रयत्न केले.

No comments