adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सौ. तु. ल. कोळंबे प्राथमिक विद्यामंदिरात शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न पालकांच्या सूचना व शैक्षणिक विषयांवर विचारविनिमय; इयत्ता चौथीच्या सहा स्कॉलरशिप पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार

  सौ. तु. ल. कोळंबे प्राथमिक विद्यामंदिरात शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न पालकांच्या सूचना व शैक्षणिक विषयांवर विचारविनिमय; इयत्ता चौथीच्या...

 सौ. तु. ल. कोळंबे प्राथमिक विद्यामंदिरात शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न

पालकांच्या सूचना व शैक्षणिक विषयांवर विचारविनिमय; इयत्ता चौथीच्या सहा स्कॉलरशिप पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार 


प्रा. सतिश गायकवाड

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर  : सौ. तु. ल. कोळंबे प्राथमिक विद्यामंदिर, मुक्ताईनगर येथे आज मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी शिक्षक-पालक सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान सचिव आदरणीय श्री. डॉ. सी. एस. चौधरी होते.

सभेमध्ये पालकांच्या विविध सूचना, शैक्षणिक अपेक्षा तसेच शिक्षकांच्या महत्त्वपूर्ण सूचनांवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक व पालक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्यावर यावेळी भर देण्यात आला.

या प्रसंगी सौ. तु. ल. कोळंबे प्राथमिक विद्यामंदिरातील इयत्ता चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेत पात्र ठरलेल्या एकूण सहा विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच भविष्यातही त्यांनी उत्तुंग यश संपादन करावे, यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

सभेच्या निमित्ताने शिक्षक-पालक संघ तसेच माता-पालक संघाची स्थापना करण्यात आली. या संघांच्या माध्यमातून शाळा, शिक्षक आणि पालक यांच्यातील समन्वय वाढवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्याचा निर्धार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. डॉ. सी. एस. चौधरी यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळा आणि पालकांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चित्रा विलास भारंबे यांनी केले. कार्यक्रमाचे सुरेख व प्रभावी सूत्रसंचालन श्रीमती प्रणिता ज्ञानेश्वर चौधरी मॅडम यांनी केले, तर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन श्री. सचिन विष्णू वराडे यांनी केले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय श्री. नारायणराव चौधरी, सौ. तु. ल. कोळंबे प्राथमिक विद्यामंदिरच्या स्कूल कमिटीचे चेअरमन आदरणीय श्री. पुरुषोत्तम भाऊ महाजन तसेच संचालक आदरणीय श्री. महेश भाऊ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. उपस्थित पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शाळेच्या विविध उपक्रमांना सहकार्य करण्याचा सकारात्मक प्रतिसाद दिला.

शिक्षक-पालकांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सकारात्मक पाऊल उचलत ही सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

No comments