पक्षविस्तारासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे : राजेश वानखेडे यांचे आवाहन इदू पिंजारी फैजपुर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर शह...
पक्षविस्तारासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे : राजेश वानखेडे यांचे आवाहन
इदू पिंजारी फैजपुर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आज सायंकाळी ७ वाजता शहराध्यक्ष रज्जाक इकबाल शेख यांच्या कार्यालयात उत्साहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सावदा येथील माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेश वानखेडे होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार शहरासह ग्रामीण भागातील प्रत्येक गावापर्यंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि जोमाने काम करावे, असे आवाहन माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी केले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचारांनी प्रेरित होऊन पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीदरम्यान पक्षाच्या विविध संघटनांमधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये नदीम तडवी यांची युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना यावेळी नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष शेख कुरबान यांनीही मार्गदर्शन करताना, पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केले.
बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रज्जाक शेख, युवक काँग्रेस शहराध्यक्ष कृष्णा चौधरी, भूपेंद्र सोनवणे, अशोक भालेराव, न्हावीचे माजी उपसरपंच नदीम पिंजारी, बिलाल शेख, नगरसेवक आवेश भांजा, जफर शेख, कासीफ शेख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नदीम तडवी यांच्या नियुक्तीमुळे युवक काँग्रेसच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळणार असून, आगामी काळात पक्षविस्तारासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

No comments