अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांना राष्ट्रपती पदक बहाल श्रीरामपूर प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) नांदगाव शिंगवे येथील रहिवाशी व ...
अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांना राष्ट्रपती पदक बहाल
श्रीरामपूर प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नांदगाव शिंगवे येथील रहिवाशी व ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयात अप्पर पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले श्री. संजय जाधव यांना उल्लेखनीय व गुणवत्ता पूर्वक सेवेबद्दल राष्ट्रपती पदक बहाल करण्यात आले. श्री. जाधव यांनी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये दिलेल्या दीर्घकालीन व निष्कलंक उत्कृष्ट सेवेची दखल घेवून त्यांची राष्ट्रपती पदकासाठी निवड करण्यात आली.
त्यांनी नांदेड, पुणे, मुंबई, कल्याण येथे पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस आयुक्त म्हणून नांव लौकिक मिळविला आहे. जुलै २०२४ मध्ये त्यांनी ठाणे येथील पदभार स्वीकारला आणि २०२५ मध्ये त्यांची पदोन्नती होवून सध्या अप्पर पोलीस आयुक्त ठाणे येथे कार्यरत आहेत.
याआधी त्यांना विविध पुरस्कार मिळालेली आहेत. त्यामध्ये सुरक्षा पदक (२०००), पुण्यभूषण पुरस्कार (२००६), आंतरिक सुरक्षा सेवा पदक बहाल झाली आहेत.राष्ट्रपती पदक बहाल झाल्याबद्दल श्री. जाधव यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
---------------------------------------------
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार रियाजभाई शेख - अहिल्यानगर
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments