मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचा अनाथ आश्रमात अनोखा स्वातंत्र्य दिन उपक्रम विकास पाटील जळगांव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मेहकर : मानव सुरक्षा...
मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचा अनाथ आश्रमात अनोखा स्वातंत्र्य दिन उपक्रम
विकास पाटील जळगांव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मेहकर : मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या वतीने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य कार्यालय, मेहकर येथे भारतमातेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विवेकानंद आश्रमातील नित्यानंद सेवा अनाथ आश्रमाला भेट देऊन मुलांना शालेय साहित्य व फळांचे वाटप करण्यात आले.
यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आश्रम परिसरात आंबा, पेरू, चिकू व लिंबू या फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. भविष्यात या झाडांपासून आश्रमातील मुलांना फळांचा लाभ मिळणार आहे. मानवतेची सेवा आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम या उपक्रमातून साधण्यात आला.
हा उपक्रम संस्थापक अध्यक्ष श्री. गजानन एस. इंगळे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला. यावेळी संस्थापक उपाध्यक्ष श्री. गंगाधर गावंडे, संस्थापक कोषाध्यक्ष संगीताताई साबणकर, संस्थापक सहसचिव श्री. गोविंद अग्रवाल यांच्यासह महाराष्ट्र, विदर्भ व विविध तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
“एकच ध्यास — निःस्वार्थ सेवाभावी जनकल्याण, मानव विकास.”

No comments