adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नशामुक्त जीवन यशसिद्धी, समृद्धी व प्रतिष्ठादायक असते- सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील

  नशामुक्त जीवन यशसिद्धी, समृद्धी व प्रतिष्ठादायक असते-  सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड...

 नशामुक्त जीवन यशसिद्धी, समृद्धी व प्रतिष्ठादायक असते-  सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 फैजपूर :- व्यसन कोणतेही असो जीवन उद्ध्वस्त करणारेच असल्याने तरुणांनी तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेट, मद्यपान या सहित कोणत्याही विघातक व्यसनापासून स्वतःला लांब ठेवून अचूक नियोजन, कठोर परिश्रम व  मार्गदर्शनाच्या बळावर यशसिद्धी प्राप्त करावी. निर्व्यसनी व्यक्तीला संपत्ती, समृद्धी व प्रतिष्ठा लाभते. यामुळे नशामुक्त फैजपूर चा संकल्प करून स्वतःसहित, परिवार व समाजाला नशा मुक्त ठेवून जनजागृती करण्यास सक्रिय व्हावे असे आवाहन संदीप पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक, फैजपूर यांनी केले.

 ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित नशामुक्ती कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डॉ मनोहर सुरवाडे यांच्यासहित श्री संदीप पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक, विनोद गाभणे पोलीस उपनिरीक्षक, नीरज बोकील, पोलिस उपनिरीक्षक, राहुल नावकर, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डॉ मच्छिंद्र पाटील युवती सभा अध्यक्षा प्रा डॉ सीमा बारी, राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी कॅप्टन प्रा डॉ राजेंद्र राजपूत, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा विवेक श्रावगे यांच्यासहित विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर विद्यार्थी विकास विभाग व पोलीस स्टेशन, फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नशामुक्ती कार्यक्रमात स्वतःसहित परिवाराला व समाजातील प्रत्येक घटकाला आयुष्य उध्वस्त करणारा नशेपासून परावृत्त करण्याची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डॉ मच्छिंद्र पाटील यांनी केले. त्यात कार्यक्रमाचे आयोजनामागील हेतू, उद्दिष्टे व विद्यार्थ्यांनी घ्यावयाची जबाबदारी यावर विस्तृत विवेचन केले. प्रथम सत्रात कॅप्टन प्रा. डॉ. राजेंद्र राजपूत यांनी व्यसनामुळे व्यक्ती, परिवार व समाजाची होणारी हानी, व्यसनाचे विविध प्रकार, नशाबंदी कायदे व कारवाई यासंबंधी मार्गदर्शन केले. तर द्वितीय सत्रात सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी व्यसन लागण्याची कारणे, दुष्परिणाम व व्यसनापासून परावृत्त होण्यासाठीच्या उपाययोजना यावर दृकश्राव्य सादरीकरण केले.

No comments