यावल शहरात समस्त सूर्यवंशी बारी समाजाच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव. भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : विद्यार्थ्यां...
यावल शहरात समस्त सूर्यवंशी बारी समाजाच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव.
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हायचं असेल तर मोबाईलचा आणि सोशल नेटवर्क चा वापर कमी करावा, तसेच ज्या समाजाने आपल्याला सन्मानित केले त्या समाजाचे ऋण व्यक्त करतांना आपण यशस्वी झाल्यानंतर या समाजातील गरजूंना मदतीसाठी पुढे हात करावा असे आवाहन आमदार अमोल जावळे यांनी केले ते यावल शहरातील सुमाई मंगल कार्यालयात आयोजित समस्त सूर्यवंशी बारी समाज च्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमात बोलत होते.
शहरातील भुसावळ टी पॉइंट जवळ असलेल्या सुमाई मंगल कार्यालयात समस्त सूर्यवंशी बारी समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम आयोजित केला होता. रविवारी आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अंतुर्ली येथील प्राचार्य बाळू बारी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार अमोल जावळे, नगरपालिकेच्या भाजपच्या गटनेचा नंदा महाजन, नगरसेविका वैशाली बारी, डॉ.रमेश बारी, डॉ.नितीन बारी, बाळकृष्ण खलसे, तुकाराम खलसे, शिवाजी पाटील, बबीता बारी, रमेश बारी, अशोक अस्वार, नामदेव अस्वार, पवन पाटील, प्रकाश खलसे, नगरसेवक सागर चौधरी, योगेश चौधरी, उमेश फेगडे, बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंग राजपूत सह मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार अमोल जावळे यांनी मोबाईल आणि सोशल नेटवर्क चा वापर मर्यादित करावा आपल्या मोबाईल मधला कॅमेरा चा वापर आणि कॅल्क्युलेटर चा वापर याची तुलना केल्यास आपण कॅमेराचा वापर अधिक करतो तेव्हा यातून लक्षात येते की आपण महत्त्व कोणाला देतो तसेच ज्या समाजाने गुणवंत विद्यार्थी तसेच यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. त्या समाजासाठी आपण यशस्वी झाल्यानंतर समाजातील गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी केले. या कार्यक्रमासाठी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी गणपत मोहन अस्वार, विलास वसंत खलसे यांनी चषक बनवून दिले होते. तर दर्शन राजेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सत्कार साठी प्रमाणपत्र तयार करून दिले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन अशोक बारी व संगीता परमानंद बारी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी करिता कार्यक्रम कार्यकारणी अध्यक्ष निलेश नागपुरे, विलास मुरलीधर काटोले, राजेंद्र काळे, माजी नगरसेवक सुनील वासुदेव खलसे- बारी यांनी परिश्रम घेतले.

No comments