adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शाडू मातीपासून गणपती बनविण्याची कार्यशाळा उत्साहात संपन्न

 शाडू मातीपासून गणपती बनविण्याची कार्यशाळा उत्साहात संपन्न   प्रा सतिश गायकवाड मुक्ताईनगर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सौ. तु. ल. कोळंबे प्...

 शाडू मातीपासून गणपती बनविण्याची कार्यशाळा उत्साहात संपन्न 


 प्रा सतिश गायकवाड मुक्ताईनगर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सौ. तु. ल. कोळंबे प्राथमिक विद्यामंदिर, मुक्ताईनगर येथे विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीपासून गणपती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.

कार्यशाळेत श्रीमती प्रणिता चौधरी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणपतीची मूर्ती तयार करण्याची कृती प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्साहाने आणि कल्पकतेने स्वतः गणपतीच्या मूर्ती तयार केल्या.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री. निलेश कळसकर  सर यांनी केले. कार्यक्रमाच्या  यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंदाचे सहकार्य लाभले.

शाळेच्या चेअरमन रोहिणीताई खडसे -खेवलकर, श्री. नारायण नामदेव चौधरी, सचिव डॉ.सी .एस.चौधरी तसेच स्कूल कमिटी अध्यक्ष पुरुषोत्तम  महाजन  , शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चित्रा भारंबे मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.

शाडू मातीपासून गणपती बनविण्याच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, सर्जनशीलता आणि गणेशोत्सवाविषयीची आवड निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने कार्यशाळा आनंददायी वातावरणात संपन्न झाली. 

No comments