adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत वात्सल्य काटे तालुक्यातून प्रथम

 इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत वात्सल्य काटे तालुक्यातून प्रथम  प्रा सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मुक्ताईनगर, जि....

 इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत वात्सल्य काटे तालुक्यातून प्रथम 


प्रा सतिश गायकवाड मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर, जि. जळगाव : इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत सौ. तु. ल. कोळंबे प्राथमिक विद्यामंदिर, मुक्ताईनगर येथील विद्यार्थी वात्सल्य गजानन काटे याने उल्लेखनीय यश संपादन करत मुक्ताईनगर तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविला आहे.शाळेतून शिष्यवृत्ती परीक्षेला एकूण सहा विद्यार्थी पात्र ठरले होते.त्यामध्ये वात्सल्य गजानन काटे,ओवी सतीश सुशिर,गणाधीश अनिल  मिरगे,शंतनु प्रदीप मिसाळ, प्राची अरविंद शेगोकार,समर्थ मोहन मराठे,

वात्सल्य काटे याने ३०० पैकी २१८ गुण मिळवत हे यश संपादन केले. त्याच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, शाळेच्या शिक्षकवृंदासह पालकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

वात्सल्यच्या या यशामागे त्याची मेहनत, नियमित अभ्यास, जिद्द आणि वर्गशिक्षक श्री.मनोज राठोड.श्रीमती आशा कोळी, श्रीमती.वंदना  भालशंकर या  शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाबद्दल मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन ॲड. रोहिणी ताई खडसे, व्हॉइस चेअरमन श्री.नारायण चौधरी स्कूल कमिटी अध्यक्ष पुरुषोत्तम भाऊ महाजन मुख्याध्यापिका श्रीमती चित्रा भारंबे मॅडम व सर्व शिक्षकवृंद यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments