adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालय, अंतुर्ली येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

 ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालय, अंतुर्ली येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन  अंतुर्ली  : किरण धा...

 ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालय, अंतुर्ली येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 


अंतुर्ली  : किरण धायले

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम श्रद्धापूर्वक आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमात लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस. ए. भोई, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी एस. एम. पगारे, माजी प्राचार्य बी. डी. बारी, पोलीस पाटील किशोर मेढे, मातंग समाजाचे भगवान शेलार, कल्पेश उबाळे, शेख भैय्या शेख करीम, प्रकाश कोळी, शांताराम महाजन तसेच वाचनालयाचे वाचक व इतर मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी एस. एम. पगारे आणि वाचनालयाचे अध्यक्ष एस. ए. भोई यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या राष्ट्रप्रेम, समाजप्रबोधन, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनातील मोलाच्या योगदानावर प्रकाश टाकला. त्यांनी उपस्थितांना महापुरुषांच्या विचारांचा आदर्श जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले.

कार्यक्रम श्रद्धापूर्वक व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. यानिमित्त उपस्थितांनी दोन्ही महापुरुषांच्या कार्याला विनम्र अभिवादन करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला.

No comments