प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी चंद्रकांत पाटील विचखेडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा ए...
प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी
चंद्रकांत पाटील विचखेडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, चोपडा येथे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थान, राष्ट्रनायक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी अत्यंत श्रद्धापूर्वक व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. रजीश बी. सर, उपमुख्याध्यापिका निखिला मॅडम, सर्व शिक्षकवृंद तसेच विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याला विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लोकमान्य टिळक यांच्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अमूल्य योगदानाचा आढावा घेण्यात आला. तसेच राष्ट्रप्रेम, शिक्षणाचे महत्त्व, सामाजिक जागृती आणि स्वराज्याच्या संकल्पनेसाठी त्यांनी केलेल्या कार्याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यांच्या विचारांचे अनुकरण करून राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्याचे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील शिक्षकवृंदाने उत्कृष्टरीत्या केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक जाणीव आणि महापुरुषांच्या विचारांविषयी आदरभाव अधिक दृढ झाला.


No comments