उपमहापौर मार्शलजी लोपीस यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड, ई श्रम कार्ड शिबीरास उत्सुर्फ प्रतिसाद... अमोल बावस्कार म...
उपमहापौर मार्शलजी लोपीस यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड, ई श्रम कार्ड शिबीरास उत्सुर्फ प्रतिसाद...
अमोल बावस्कार मुंबई
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नालासोपारा ता, २२ :- उपमहापौर मार्शलजी लोपीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आयुष्मान भारत कार्ड,आभा कार्ड, ई श्रम कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन बहुजन विकास आघाडी भवन येथे करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
बहुजन विकास आघाडीचा समाजसेविका रूचिता नाईक यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात शेकडो पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून त्यांना आयुष्मान भारत कार्ड उपलब्ध करून देण्यात आले. शिबिरादरम्यान नागरिकांना योजनेअंतर्गत मिळणार्या मोफत आरोग्यसेवा, शासकीय व मान्यताप्राप्त रुग्णालयांतील उपचार सुविधा तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी उपलब्ध असलेल्या लाभांची सविस्तर माहिती देण्यात आली. लाखो रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळवून देणारी ही योजना गरजू कुटुंबांसाठी मोठा आधार ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या उपक्रमामुळे नागरीकांनी आयोजकांचे आभार मानले.
शिबीरास नगरसेवक अतुल दादा साळुंखे,नगरसेविका गायत्री ताई सावंत,सविताताई कांबळे,रोहन डिसूझा, नवनाथ पगारे,अभिषेक हाटकर रिझवाना शेख, शुभांगी धर्शे, अनिता कनोजिया, भाविका चावडा, अमित नाईक उपस्थित होते.

No comments