adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नगरसेविका वैशाली बारी यांच्या घरी कानबाई मातेचे उत्साहात आगमन

 नगरसेविका वैशाली बारी यांच्या घरी कानबाई मातेचे उत्साहात आगमन  भरत कोळी यावल   (संपादक -:- हेमकांत गायकवाड) खान्देशचे आराध्य दैवत म्हणून का...

 नगरसेविका वैशाली बारी यांच्या घरी कानबाई मातेचे उत्साहात आगमन 


भरत कोळी यावल  

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

खान्देशचे आराध्य दैवत म्हणून कानबाई मातेला विशेष धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व आहे. खान्देशातील अनेक कुटुंबांमध्ये कानबाई मातेची श्रद्धेने पूजा केली जाते. विशेषतः श्रावण महिन्यात कानबाई उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जातो.

याच पार्श्वभूमीवर यावल शहरातील नगरसेविका सौ. वैशाली निलेश बारी व निलेश बारी यांच्या येथे कानबाई मातेचे मोठ्या उत्साहाने वाजत-गाजत स्थापना करण्यात आली झाले. यावेळी शहरातील तसेच परिसरातील महिला व पुरुष भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जल्लोषात मातेचे स्वागत केले.

कानबाई माता ही कुटुंबाचे रक्षण करणारी तसेच सुख-समृद्धी, आरोग्य आणि भरभराट देणारी देवी म्हणून भाविकांमध्ये श्रद्धेने पूजली जाते. या उत्सवाच्या निमित्ताने नातेवाईक, आप्तेष्ट आणि समाजबांधव एकत्र येतात. त्यामुळे कुटुंबातील एकोपा वाढविण्यासोबतच खान्देशची समृद्ध लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या उत्सवातून घडते. कानबाई माता उत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून खान्देशच्या श्रद्धा, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकतेचे प्रतीक मानला जातो.

No comments