हातेड खुर्द विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी किशोर सोनवणे, तर व्हाईस चेअरमनपदी कपिल बाविस्कर निवडणूक प्रक्रिया उत्साहात पार; परिवर्तन...
हातेड खुर्द विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी किशोर सोनवणे, तर व्हाईस चेअरमनपदी कपिल बाविस्कर
निवडणूक प्रक्रिया उत्साहात पार; परिवर्तन पॅनलच्या प्रमुखांसह संचालक मंडळ व सभासदांकडून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
हातेड खुर्द, ता. चोपडा, दि. १२ ऑगस्ट २०२६ : हातेड खुर्द येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक आज बुधवार, दि. १२ ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
सदर निवडणूक प्रक्रिया श्री. भूषण बारी, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, चोपडा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सोसायटीचे विद्यमान सचिव श्री. विकास पाटील तसेच संस्थेचे मान्यवर संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रियेत श्री. किशोर आत्माराम सोनवणे यांची चेअरमनपदी, तर श्री. कपिल रमेश बाविस्कर यांची व्हाईस चेअरमनपदी निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे संस्थेच्या सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवनिर्वाचित चेअरमन किशोर आत्माराम सोनवणे व व्हाईस चेअरमन कपिल रमेश बाविस्कर यांचे संस्थेचे सचिव श्री. विकास पाटील, संपूर्ण संचालक मंडळ तसेच सर्व सभासद बंधू-भगिनींच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तसेच त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी परिवर्तन पॅनलचे प्रमुख उद्योगपती राहुलदादा सोनवणे व उद्योगपती भूषणदादा बाविस्कर यांनीही नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हातेड खुर्द विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या माध्यमातून सभासदांच्या हितासाठी आणि संस्थेच्या विकासासाठी अधिक प्रभावीपणे कार्य केले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


No comments