निधन वार्ता सुभद्राबाई जगन्नाथ फेगडे भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : ये...
निधन वार्ता
सुभद्राबाई जगन्नाथ फेगडे
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : येथील देशपांडे गल्ली परिसरातील रहिवासी सुभद्राबाई जगन्नाथ फेगडे (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने दि. ७ ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
सुभद्राबाई फेगडे या यावल नगरपालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी शशिकांत फेगडे तसेच भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक हेमराज उर्फ बाळासाहेब फेगडे यांच्या मातोश्री होत. तसेच माजी नगराध्यक्षा माधुरीताई फेगडे यांच्या त्या सासूबाई होत. त्यांच्या निधनाने फेगडे परिवारावर शोककळा पसरली असून, नातेवाईक, मित्रपरिवार व नागरिकांकडून श्रद्धांजली व्यक्त करण्यात येत आहे.

No comments