adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल येथे आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 यावल येथे आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन  भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित...

 यावल येथे आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल : ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या वतीने यावल येथे भव्य सांस्कृतिक रॅलीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावल शहरातील फैजपूर रोडलगत असलेल्या मनुदेवी मंदिराजवळ सकाळी ९.३० वाजता भव्य सांस्कृतिक रॅलीला सुरुवात होणार आहे. जळगाव जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. शांताराम दादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावल-रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल भाऊ जावळे व माजी जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या हस्ते सांस्कृतिक रॅलीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. 


यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष साळुंखे, माजी सरपंच यशवंत सपकाळे,भाजपा अनुसूचित जमाती जिल्हाध्यक्ष हरलाल भाऊ कोळी, पंचायत समितीचे माजी सदस्य विलास तायडे, जितेंद्र सपकाळे, भाजपा तालुका अध्यक्ष सागर कोळी, बबलू भाऊ कोळी, नितीन सपकाळे, नगरसेविका सविता नन्नवरे, माजी नगराध्यक्ष सुरेखा कोळी यांच्यासह मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

भव्य सांस्कृतिक रॅलीची सुरुवात मनुदेवी मंदिर येथून होऊन तिची सांगता यावल येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात होणार आहे. रॅलीमध्ये आदिवासी संस्कृती, परंपरा व कला यांचे दर्शन घडणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष प्रदीप कोळी, उपाध्यक्ष निकिता कोळी, दीपक कोळी, मुकेश कोळी, खजिनदार खेमचंद कोळी तसेच समितीतील सदस्यांनी केले आहे.

No comments