ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप होळनांथे, ता. शिरपूर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जि. प. उर्...
ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
होळनांथे, ता. शिरपूर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जि. प. उर्दू शाळा, होळनांथे, ता. शिरपूर, जि. धुळे येथे ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम अब्दुल सरदार पटेल, सेवानिवृत्त शिक्षक व मुख्याध्यापक, जि. प. उर्दू शाळा, होळनांथे यांच्या तर्फे राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्यात आले.
ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत शिक्षणाची गोडी वाढविण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. “शिक्षणाला मदत, गरजू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन” या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाला खालील मान्यवर उपस्थित होते. जनाब राहिल खाटीक साहब (स्कूल अध्यक्ष), हाफिज अयाज साहब (पेश इमाम, मक्का मस्जिद), जनाब इस्माइल मन्यार साहब, जनाब जुबेर खाटीक साहब (हेडमास्टर), जनाब साबिर सर उपस्थित होते

No comments