सामाजिक प्रायश्चित्त घेऊन वृद्धाश्रमांना नंदनवन करणे काळाची गरज : विजय लुल्हे जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) " सामाजिक...
सामाजिक प्रायश्चित्त घेऊन वृद्धाश्रमांना नंदनवन करणे काळाची गरज : विजय लुल्हे
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
" सामाजिक प्रायश्चित्त घेऊन वृद्धाश्रमांना नंदनवन करणे काळाची गरज आहे " असे प्रतिपादन भारतरत्न डॉ.ए .पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाध्यक्ष विजय लुल्हे यांनी केले.
आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन शुक्रवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी संजीवन ज्येष्ठ नागरिक मंडळ आणि भारतरत्न डॉ. ए. पी .जे . अब्दुल कलाम पुस्तक भिशी यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला त्यावेळी ज्येष्ठांचा सत्कार करतांना लुल्हे बोलत होते.
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त निवासस्थानी जाऊन अनौपचारिक सत्कार करण्यात आला . प्रारंभी ज्येष्ठांचे कुटुंबियांकडून अग्रपूजन व औक्षण करण्यात आले. त्यानंतर शाल , श्रीफळ , पुस्तक देऊन त्यांचा हृद्य सत्कार पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाध्यक्ष विजय लुल्हे यांच्या हस्ते करण्यात आला.
🔰*सत्कारार्थींची नावे / योगदान -*
💐श्रीमती भागीरथी पुना बारी ( वय - ८५ ) पतीच्या निधना नंतर आर्थिक विवंचनेत शेतीकाम , नागवेल पानांची जोडणी कामे करून ५ मुलांचे शिक्षण केले.
💐सौ. पुष्पा जाधव वय - ७२ ( सेवानिवृत्त बी.एस.एन.एल. कर्मचारी ) - कौटुंबिक जबाबदारी घेऊन मुलांचे उच्च शिक्षण केले.
💐श्री. न्हानू बुधा दाभाडे ( वय - ७५ ) पत्नीच्या अकाली मृत्यूनंतर पुनर्विवाह न करता ३ मुलांचे संगोपन करून शिक्षण दिले. इंजि .
💐साहेबराव देवराम पाटील ( वय - ६८ ) माजी उपाध्यक्ष, म.रा.कनिष्ठ अभियंता संघटना तसेच साहेबराव पाटील हे जे शासकीय अभियंता सहकारी पतपेढी मर्यादित जळगावचे संस्थापक चेअरमन आणि आजीव अध्यक्ष असून त्या अंतर्गत अभियंता भवन आणि वाचनालय व ग्रंथालय स्थापना करून वाचन चळवळ वृद्धींगत करीत आहेत. सोसायटी अंतर्गत उत्कृष्ट कार्यकर्त्यांना धनादेश देऊन सन्मानित करणे आणि समाज प्रबोधनाचे कार्यक्रम राबवितात.
सत्काराप्रसंगी प्रमुख अतिथी संजीवन ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सहसचिव प्रकाश बारी, डिगंबर ढाके ( निवृत्त बी. एस. एन. एल कर्मचारी ), शामकांत वर्डीकर ( अध्यक्ष, मल्हारराव होळकर कला, ज्ञान विज्ञान बहुउद्देशीय मंडळ ) यांसह पद्माकर जाधव, श्रीधर जाधव, सौ. आरती जाधव, ग्रिनीस बुक ऑफ वर्ल्ड पुरस्कार प्राप्त कलाशिक्षक सुनील दाभाडे, सौ. दिक्षा दाभाडे,सौ. कविता पवार, अंकिता मावळे, सौ. कल्पना पाटील, विश्वेश पाटील
कुटूंबिय उपस्थित होते .
ज्येष्ठ नागरिकांच्या सत्काराची प्रेरणा संजीवन ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष पुंडलिक म्हस्के, सचिव प्रकाश बारी सहसचिव दीपक तांबोळी, संचालिका कवयित्री इंदिरा जाधव यांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपाध्यक्ष सुनिल जाधव आणि सहखजिनदार उल्हास चौधरी यांनी अमूल्य सहकार्य केले.

No comments