अमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपी अखेर एलसीबीच्या जाळ्यात सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर :- नगर- पुणे सी...
अमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपी अखेर एलसीबीच्या जाळ्यात
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :- नगर- पुणे सीमेवर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका मोठ्या कारवाईत अमली पदार्थांच्या तस्करीतील कुख्यात फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.पोलिसांच्या नजरेतून सुटण्यासाठी पुण्यातील शिरूर तालुक्यात लपून बसलेल्या आरोपीचा खेळ अखेर खबऱ्याच्या एका पक्क्या बातमीमुळे खल्लास झाला.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील दाखल गुन्ह्यांमधील फरार आणि पाहिजे असलेल्या आरोपींना शोधून तात्काळ गजाआड करण्याचे कडक आदेश दिले होते.या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तातडीने सूत्रे हलवत एक विशेष पथक तैनात केले.यामध्ये:
पोलीस उपनिरीक्षक संदिप दरवडे,पोलीस अंमलदार बाळासाहेब गुंजाळ,मनोज साखरे,रोहित मिसाळ प्रशांत राठोड आणि प्रताप देवकाते
या पथकाला फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी तातडीने रवाना करण्यात आले.दि.०८ ऑगस्ट २०२६ रोजी एलसीबीचे पथक शोध मोहिमेवर असताना गुप्त बातमीदाराकडून एक खळबळजनक माहिती मिळाली.एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गु.र.नं. ५७०/२०२६ (NDPS कायदा कलम ८(क), २२(ब)) या अमली पदार्थांच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी करडे (ता.शिरूर,जि.पुणे) येथे लपून बसल्याचे निष्पन्न झाले.तुषार उर्फ नाना अंकुश तांबे (वय ३१ वर्ष,रा. ढवळगाव, ता. श्रीगोंदा,जि.अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.ताब्यात घेतलेला आरोपी तुषार तांबे हा एमआयडीसी पोलीस ठाण्यातील एनडीपीएस गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले आहे.या प्रकरणाचा पुढील सखोल तपास आता एमआयडीसी पोलीस करत आहेत.ही धडक आणि यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांच्या थेट मार्गदर्शन व सूचनेनुसार एलसीबीच्या पथकाने फत्ते केली आहे.

No comments