adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पोलीस हवालदार भरत गायकवाड यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप मारवड पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाकडून शस्त्र सलामी; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

 पोलीस हवालदार भरत गायकवाड यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप मारवड पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाकडून शस्त्र सलामी; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह क...

 पोलीस हवालदार भरत गायकवाड यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

मारवड पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाकडून शस्त्र सलामी; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली  


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा : मारवड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोहेकॉ/२८९४ भरत एकनाथ गायकवाड, रा. अंबाडे, ता. चोपडा, जि. जळगाव यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी पोलीस विभागाच्या वतीने उपस्थित राहून सलामीसह मानवंदना देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

अंत्यसंस्कारावेळी पोलीस पथकाकडून हवेत गोळीबार करून शस्त्र सलामी देण्यात आली. शोकाकुल वातावरणात पोलीस विभागाच्या वतीने त्यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला.

यावेळी चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) सुनील पाटील, चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले, मारवड पोलीस ठाण्याचे API मन्सूरी तसेच मुख्यालयातील गार्ड पथक आणि मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

पोलीस सेवेत कार्यरत असलेल्या भरत एकनाथ गायकवाड यांच्या निधनाने पोलीस विभागासह त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. अंत्यसंस्कारावेळी उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

No comments