adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

माजी विद्यार्थी संघाच्या पुढाकारातून विटनेर शाळेत ढोल पथकाची स्थापना स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ₹११ हजारांचे वाद्यसाहित्य शाळेला भेट

 माजी विद्यार्थी संघाच्या पुढाकारातून विटनेर शाळेत ढोल पथकाची स्थापना  स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ₹११ हजारांचे वाद्यसाहित्य शाळेला भ...

 माजी विद्यार्थी संघाच्या पुढाकारातून विटनेर शाळेत ढोल पथकाची स्थापना

 स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ₹११ हजारांचे वाद्यसाहित्य शाळेला भेट 

माजी विद्यार्थी संघाच्या वतीने मुख्याध्यापक
श्री. हेमंत भामरे यांना ढोल पथकासाठी
वाद्यसाहित्य सुपूर्द करताना उपस्थित मान्यवर."

 चोपडा  प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच कला, संस्कार, शिस्त आणि नेतृत्व गुणांमध्येही प्रगती करावी, या उदात्त हेतूने जिल्हा परिषद सेमी इंग्रजी उच्च प्राथमिक शाळा, विटनेर येथे माजी विद्यार्थी संघाच्या पुढाकारातून ढोल पथकाची स्थापना करण्यात आली.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वाद्यवादनाचे प्रशिक्षण मिळावे तसेच त्यांच्यामध्ये शिस्त, अनुशासन, पथक संचलन, कवायत, सांघिक भावना आणि देशभक्तीची जाणीव अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने माजी विद्यार्थी संघाने पुढाकार घेत मोठा ढोल, नाशिक ढोल, ताशा, साइड ड्रम आदी वाद्यसाहित्य शाळेस भेट दिले. सुमारे ₹११,००० किमतीचे हे साहित्य शाळेचे मुख्याध्यापक श्री. हेमंत भामरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासोबत विविध कला व उपक्रमांची संधी उपलब्ध करून देण्यासाठी माजी विद्यार्थी संघ विटनेर सातत्याने कार्यरत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही अशाच विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी माजी विद्यार्थी संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच शिक्षक श्री. विकास पाटील, सौ. मनीषा पाटील व श्री. प्रविण पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शाळेच्या वतीने माजी विद्यार्थी संघाचे आभार व्यक्त करण्यात आले.

No comments