adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मोकाट कुत्र्यांचा (श्वानांचा) बंदोबस्त करा; डॉ. अनिलकुमार पालीवाल यांची नगरपरिषदेकडे मागणी

मोकाट कुत्र्यांचा (श्वानांचा) बंदोबस्त करा; डॉ. अनिलकुमार पालीवाल यांची नगरपरिषदेकडे मागणी फाईल फोटो  चोपडा प्रतिनिधी संपादक : हेमकांत गाय...

मोकाट कुत्र्यांचा (श्वानांचा) बंदोबस्त करा; डॉ. अनिलकुमार पालीवाल यांची नगरपरिषदेकडे मागणी
फाईल फोटो 

चोपडा प्रतिनिधी
संपादक : हेमकांत गायकवाड

चोपडा : शहरातील विविध भागात, विशेषतः कॉलनी परिसरात मोकाट कुत्र्यांनी (श्वानांनी) उच्छाद मांडला असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दिवसा देखील मोकाट कुत्र्यांचा सैरभैर वावर सुरू असल्याने शाळकरी लहान मुले, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कॉलनी परिसरात मोकाट कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे नागरिकांना त्रास होत असून, लहान मुले रस्त्याने जात असताना कुत्रे (श्वान) त्यांच्या मागे धावत असल्याचे प्रकार घडत आहेत. कुत्र्याने चावा घेण्याच्या भीतीने काही मुले घाबरून पळ काढतात. अशावेळी कुत्रेही त्यांच्या मागे धावत असल्याने अपघाताची शक्यताही निर्माण होत आहे.

शहरात काही नागरिकांनी कुत्रे पाळलेले आहेत. मात्र, संबंधित पाळीव कुत्र्यांनाही मोकाटपणे रस्त्यावर सोडले जात असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येते. त्यामुळे पाळीव तसेच मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार व भाजप कार्यकर्ते डॉ. अनिलकुमार पालीवाल यांनी चोपडा नगरपरिषदेकडे मोकाट कुत्र्यांचा (श्वानांचा) बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. याबाबत नगराध्यक्षा तसेच मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून, शहरातील मोकाट कुत्र्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर नियमानुसार तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच ज्या नागरिकांनी कुत्रे पाळले आहेत, त्यांनी त्यांना मोकाट सोडू नये, याबाबत संबंधित पालनकर्त्यांना समज देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणीही डॉ. पालीवाल यांनी केली आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नगरपरिषदेने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

No comments