जळगावात बोगस पत्रकारांवर कारवाईची मागणी; गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन (डॉ.अनिलकुमार पालीवाल).. (संपा...
जळगावात बोगस पत्रकारांवर कारवाईची मागणी; गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
(डॉ.अनिलकुमार पालीवाल)..
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव :- जिल्ह्यात पत्रकार असल्याचे भासवून शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, व्यापारी, उद्योजक तसेच विविध व्यावसायिकांकडून खोट्या ओळखपत्रांच्या आधारे पैशांची उकळपट्टी करणाऱ्या बोगस अथवा तोतया पत्रकारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ, जळगाव जिल्हा यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी जळगाव तसेच अपर पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात काही व्यक्ती स्वतःला पत्रकार म्हणून सादर करत असून, त्यांच्याकडे कोणतीही अधिकृत मान्यता, नियुक्तीपत्र किंवा वैध ओळखपत्र नसतानाही ते पत्रकारितेचा धाक दाखवून विविध कार्यालये व व्यावसायिकांकडून पैशांची मागणी करतात. अशा प्रकारांमुळे खऱ्या पत्रकारितेची प्रतिमा मलिन होत असून समाजात संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. संघटनेने प्रशासनाकडे मागणी केली आहे की, अशा तोतया पत्रकारांची ओळख पटवून त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता व इतर संबंधित कायद्यांनुसार तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच जिल्ह्यातील अशा संशयित व्यक्तींची यादी तयार करून त्यांच्यावर नियमित देखरेख ठेवावी. गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित आणि प्रभावी कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. प्रत माहितीसाठी हे निवेदन अपर पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व पोलीस निरीक्षक यांनाही पाठविण्यात आले आहे
No comments