लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आचरणात आणा - जेष्ठ पत्रकार राजीव बोरसे रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेम...
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आचरणात आणा - जेष्ठ पत्रकार राजीव बोरसे
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सर्वांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आचरणात आणणे गरजेचे आहे याचबरोबर सर्व युवक युवतींनी आपले आरोग्य शिक्षण उद्योग नोकरी याकडे लक्ष देऊन प्रगती करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन निंभोरा बु:तालुका रावेर येथील इंदिरानगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून जेष्ठ पत्रकार
राजीव बोरसे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले यावेळी सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे डॉ. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस राजीव बोरसे,संदीप महाले, दस्तगीर खाटीक, स्वप्निल गिरडे व मान्यवरांनी पुष्प अर्पण करून प्रतिमेचे पूजन केले. यावेळी राजीव बोरसे, दस्तगीर खाटीक ,स्वप्निल गिरडे, यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी प्रमुख मान्यवरांचे स्वागत गजानन सोनवणे व कार्यकर्त्यांनी केले या कार्यक्रमास बबन उमक, शंकर सोनवणे, विष्णू उबाळे,दिलीप सोनवणे, मगन उमक, ज्ञानेश्वर उमक, भरत उमक, मुकेश अवसरमल, विनोद सोनवणे, प्रमोद सोनवणे, चेतन सोनवणे, यासह महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भगवान सोनवणे,मोहित सोनवणे,मनोज सोनवणे, कार्तिक सोनवणे ,होमराज उमक, यश उमक,प्रेम उमक, जय उबाळे, अश्विन अवसरमल, मोहित उमक,चंदन अवसरमल, रोहन उबाळे ,पवन सोनवणे, विनय सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

No comments