adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर नगरपालिकेच्या हद्दवाढीचा प्रश्न ऐरणीवर; मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी महत्वपूर्ण चर्चा

 फैजपूर नगरपालिकेच्या हद्दवाढीचा प्रश्न ऐरणीवर; मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी महत्वपूर्ण चर्चा   इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गा...

 फैजपूर नगरपालिकेच्या हद्दवाढीचा प्रश्न ऐरणीवर; मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी महत्वपूर्ण चर्चा  


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर नगरपालिकेच्या हद्दवाढीसंदर्भात आज दि ११ ऑगस्ट रोजी  मंत्रालयातील नगरविकास विभागात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. यावेळी नगरविकास विभागाच्या सहसचिव मा. वैजापूरकर मॅडम यांची भेट घेऊन फैजपूर नगरपालिकेच्या हद्दवाढीच्या प्रस्तावासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी फैजपूरचे माजी नगराध्यक्ष शेख कुर्बान शेख हाजी करीम तसेच मोहम्मद  पिंजारी  उपस्थित होते. फैजपूर शहराच्या वाढत्या विकासाच्या दृष्टीने नगरपालिका हद्दवाढीचा विषय महत्त्वाचा असून, याबाबत आवश्यक कार्यवाही व पुढील प्रक्रियेवर चर्चा करण्यात आली.

फैजपूर शहराच्या भविष्यातील विकासाला गती मिळावी, नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि शहराचा नियोजनबद्ध विस्तार व्हावा, यासाठी हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

No comments