कविता सोनवणे (कोळी) यांची भाजपा धुळे महानगर जिल्हा अनुसूचित जमाती (S.T.) मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती शामसुंदर सोनवणे वि.प्र. (संपादक -:- हे...
कविता सोनवणे (कोळी) यांची भाजपा धुळे महानगर जिल्हा अनुसूचित जमाती (S.T.) मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती
शामसुंदर सोनवणे वि.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धुळे : भारतीय जनता पक्षाच्या धुळे महानगर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती (S.T.) मोर्चाच्या अध्यक्षपदी श्रीमती कविता शरद सोनवणे (कोळी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री व खासदार सौ. भारती ताई पवार यांच्या हस्ते कविता सोनवणे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
भाजपा धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र महादेव अंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण, पणन मंत्री तथा पालकमंत्री धुळे जिल्हा जयकुमारभाऊ रावल, संघटन मंत्री रविजी अनासपुरे, धुळे शहराचे आमदार अनुपभैय्या अग्रवाल, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धनजी कदमबांडे व माजी आमदार कुणालजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली.
कविता सोनवणे यांच्या अनुभव, कार्यतत्परता व संघटन कौशल्याचा विचार करून पक्षाची ध्येय-धोरणे व कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल कविता सोनवणे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

No comments