adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

माजी मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेस माल्यार्पण

 माजी मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख यांच्या पुण्यतिथी साजरी  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा तालुका व शहर भारतीय राष...

 माजी मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख यांच्या पुण्यतिथी साजरी 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय) कमिटीच्या वतीने माजी मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मा. भैय्यासाहेब ॲड. संदीप सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी स्व. विलासरावजी देशमुख यांच्या कार्याचे व महाराष्ट्राच्या विकासातील त्यांच्या योगदानाचे स्मरण करत महाराष्ट्राच्या राजकारणात व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडून विकासाभिमुख नेतृत्वाची ओळख त्यांनी निर्माण केली. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन काँग्रेस पक्षाच्या विचारधारेनुसार समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेशबापू पाटील, तालुकाध्यक्ष मोहन पाटील, शहराध्यक्ष अशोक साळुंखे, जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर सांगोरे, रमेश शिंदे, मधुकर बाविस्कर, एस डी पाटील, जिल्हा सचिव आरिफ शेख सिद्दिकी, नगरसेवक रमाकांत ठाकूर, अमोल पाटील,सुमित पाटील, संदीप देसले, किसान सेल अध्यक्ष शशिकांत साळुंखे, रमाकांत सोनवणे, देविदास पारधी, प्रवीण जैन, इलियास पटेल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments