माजी पंतप्रधान स्व. राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोज...
माजी पंतप्रधान स्व. राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोजी चोपडा तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय) कमिटीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष मा. भैय्यासाहेब ॲड.संदीप सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे माजी पंतप्रधान, आधुनिक भारताचे शिल्पकार स्व. राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्व. राजीवजी गांधी यांच्या देशाच्या विकासातील योगदानाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली. स्व. राजीवजी गांधी यांनी देशाच्या प्रगतीसाठी विज्ञान, तंत्रज्ञान, संगणकीकरण तसेच युवकांच्या सहभागाला प्रोत्साहन दिले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारताच्या आधुनिक विकासाला नवी दिशा मिळाली.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस सेवादल अजबराव पाटील, तालुकाध्यक्ष मोहन पाटील, शहराध्यक्ष अशोक साळुंखे, मधुकर बाविस्कर, जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर सांगोरे, जिल्हा सचिव आरिफ सिद्दिकी, सूतगिरणी संचालक एस. डी. पाटील, विक्रम पाटील, देविदास साळुंखे, विकास पाटील, सुमित पाटील, गोवर्धन पाटील, प्रकाश पाटील, किसान सेल अध्यक्ष शशिकांत साळुंखे, माणिक पाटील, दीपक चौधरी, देवराम पाटील, अकिल शेख, प्रवीण सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments