adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्री शिवाजी आदर्श प्राथमिक केंद्र शाळा हातेड येथे ‘रक्षाबंधन’निमित्त राखी बनविण्याची कार्यशाळा उत्साहात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाली चालना; स्वावलंबन व आत्मविश्वास निर्मितीचा उपक्रम

 श्री शिवाजी आदर्श प्राथमिक केंद्र शाळा हातेड येथे ‘रक्षाबंधन’निमित्त राखी बनविण्याची कार्यशाळा उत्साहात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाली...

 श्री शिवाजी आदर्श प्राथमिक केंद्र शाळा हातेड येथे ‘रक्षाबंधन’निमित्त राखी बनविण्याची कार्यशाळा उत्साहात

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाली चालना; स्वावलंबन व आत्मविश्वास निर्मितीचा उपक्रम


शामसुंदर सोनवणे हातेड/ चोपडा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

श्री शिवाजी आदर्श प्राथमिक केंद्र शाळा, हातेड येथे रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन व आत्मविश्वास निर्माण करण्यासोबतच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने राखी बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वतःच्या कल्पकतेतून विविध रंगांच्या व आकर्षक राख्या तयार केल्या. विद्यार्थ्यांनी स्वतः राखी तयार करण्याचा आनंद घेत कला व कार्यानुभवाच्या माध्यमातून सर्जनशीलता, कल्पकता आणि स्वावलंबनाचे धडे गिरविले. 


रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण नसून त्यामागील संस्कार, आपुलकी, बंधुभाव आणि नात्यांची जपणूक विद्यार्थ्यांना समजावी, या दृष्टिकोनातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने तयार केलेल्या राख्यांमुळे शाळेच्या परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यशाळेसाठी श्रीमती पल्लवी शिंदे मॅडम, श्रीमती रोहिणी पवार मॅडम, सौ. मंदाकिनी पाटील मॅडम, श्री. संदीप सनेर सर आणि श्री. दिलीप खैरनार सर यांनी विशेष मार्गदर्शन केले.

तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. शैलेंद्र रोहिदास अहिरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकवृंद व सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यशाळा यशस्वी केली.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या आणि त्यांच्यात स्वावलंबन व आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

No comments