adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

“डांभुर्णी हादरले! भर चौकात देशी कट्ट्यातून हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या विद्यमान सरपंचाला अटक!”

“डांभुर्णी हादरले! भर चौकात देशी कट्ट्यातून हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या विद्यमान सरपंचाला अटक!”  भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...

“डांभुर्णी हादरले! भर चौकात देशी कट्ट्यातून हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या विद्यमान सरपंचाला अटक!” 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल : तालुक्यातील डांभुर्णी येथे भर चौकात देशी कट्ट्यातून हवेत गोळीबार करून परिसरात दहशत निर्माण केल्याच्या गंभीर प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी यावल पोलिसांनी तातडीने कारवाई करत कोळन्हावी येथील विद्यमान सरपंच विकास उर्फ गोटू जगन्नाथ सोळंके (वय ३७) याला जळगाव येथून ताब्यात घेत अटक केली असून, गोळीबारासाठी वापरण्यात आलेला देशी कट्टा व जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले आहे.

डांभुर्णी, ता. यावल येथील भर चौकात एक व्यक्ती गावठी कट्ट्यातून हवेत फायरिंग करत असल्याची माहिती यावल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांना गुरूवारी रात्री मिळाली होती. तेव्हा त्यांनी पोलिस पथकासह घटनास्थळाकडे धाव घेतली.घटनास्थळी रिकामी पुंगळी; पोलिसांनी पुरावे केले जप्त घटनास्थळी पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद, पोलिस हेड कॉन्स्टेबल रोहिल गणेश, अनिल साळुंखे, हितेश बागुल आदी अधिकारी व कर्मचारी तातडीने पोहोचले. परिस्थितीची पाहणी केली असता किनगाव रोडलगत असलेल्या शिवसम्राट सोयाबीन बिर्याणी दुकानाजवळ नुकत्याच करण्यात आलेल्या फायरिंगची रिकामी पुंगळी आढळून आली. त्यानंतर परिसरातील दुकानदार व नागरिकांकडे विचारपूस करण्यात आली. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी रिकामी पुंगळी तसेच इतर महत्त्वाचे भौतिक पुरावे ताब्यात घेतले. भर चौकात गोळीबार झाल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.तर या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात हवालदार हितेश बागुल यांच्या फिर्यादीवरून आर्म ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात अाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक मैनोद्यीन सैय्यद करीत आहे.

आरोपी जळगावकडे गेल्याची माहिती पोलिसांची संयुक्त मोहीम

फायरिंग केल्यानंतर आरोपी विकास उर्फ गोटू जगन्नाथ सोळंके हा जळगावकडे रवाना झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक अनिल महाजन व पोलिस हेड कॉन्स्टेबल सचिन पाटील यांना आरोपीच्या शोधासाठी जळगाव येथे रवाना करण्यात आले. दरम्यान, यावल पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे व त्यांच्या पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल सलीम तडवी, पोलिस कॉन्स्टेबल प्रदीप चवरे, पोलिस कॉन्स्टेबल सचिन घुगे यांनीही संयुक्त शोधमोहीम सुरू केली. पोलिसांच्या या वेगवान कारवाईमुळे आरोपीस अखेर रात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास जळगाव येथील कालिका माता मंदिर परिसरातून ताब्यात घेण्यात आले‌ 

No comments