मलकापूर बस स्थानकात मद्यधुंद इसमाचा धिंगाणा लोखंडी राॅडने पाच एसटी बसच्या काचा फोडल्या अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...
मलकापूर बस स्थानकात मद्यधुंद इसमाचा धिंगाणा लोखंडी राॅडने पाच एसटी बसच्या काचा फोडल्या
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापुर :- शहरातील बस स्थानकात मद्यधुंद अवस्थेतील एकाने लोखंडी रॉड च्या सहाय्याने बस स्थानकात उभ्या असलेल्या पाच बससेच्या दर्शनी काचा फोडून सुमारे 80 हजार रुपयाचे शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याची घटना दि. 18 ऑगस्ट 26 रोजी पहाटे दिडच्या वाजेच्या सुमारास घडली याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी संजय गवई रा. चिंचोल ता. मलकापूर याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.शहर पो.स्टे ला राज्य परिवहन विभागात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेले संजय सुखदेव खंडागळे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की,ते मलकापूर बस स्थानकात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत घटनेच्या वेळी नाईट राउंड ड्युटीवर होते बस स्थानकात झोपलेल्या प्रवाशांना बस आल्याने उठवत असताना त्यांना अचानक तोडफोडीचा आवाज येऊ ऐकू आला खंडागळे हे सहकार्यांसह आवाजाच्या दिशेने गेले असता एक इसम हातात लोखंडी रॉड घेऊन बसस्थानकात उभ्या असलेल्या एसटी बसच्या दर्शनी काचा फोडताना दिसला. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने हाताला घटका देऊन तेथून पुढे काढला. संबंधित इसम दारूचे नशेत असल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले.या घटनेत एम एच 40 वाय 5830,एम.एच 14 बि.टी 4356, एम एच 40 ऐ क्यु 6442,एम एच 40 ऐ क्यु 6442,एम एच 40 वाय 5695 या पाच एसटी बसेसच्या दर्शनी काचा फोडण्यात आल्या प्रत्येक काचेची किंमत अंदाजे 16 हजार रुपये असून 80 हजार रुपयाचे शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. फिर्यादी संजय सुखदेव खंडागळे यांच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी गुन्हा क्रमांक 606/26 कलम 324 (4) BNS तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधात्मक अधिनियमाच्या कलम 3 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस शहर पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. अमोल शैले करीत आहे.

No comments