adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रक्ताचा सडा पाडण्याआधीच गेम ओव्हर! चांदबिबी महालावर गावठी कट्टे रोखून बसलेला मोक्यातील कुख्यात आरोपी 'लखन' गजाआड; थरारक पाठलाग करून LCB ने आवळल्या मुसक्या! ​अहिल्यानगर (प्रतिनिधी):-ऐतिहासिक चांदबिबी महाल परिसरात गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसांसह दबा धरून बसलेल्या गुन्हेगारांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या आहेत.तब्बल १७ गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला, ‘मोक्का’ कायद्यांतर्गत आणि अनेक गुन्ह्यांत फरार असलेला कुख्यात गुन्हेगार लक्ष्मण उर्फ लखन कासार अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.अहिल्यानगर-पाथर्डी रस्त्यावरील चांदबिबी महालाजवळील सर्कलवर विना क्रमांकाच्या पल्सर मोटारसायकलजवळ काही संशयित हत्यारांची विक्री करण्यासाठी उभे असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिसांनी पंचांसमक्ष सापळा रचताच संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला.मात्र, पथकाने पाठलाग करून तिघांनाही जमिनीवर झोपवून बेड्या ठोकल्या.​​लक्ष्मण उर्फ लखन बाबासाहेब कासार (वय २९,रा. कासारवाडी,ता.पाथर्डी) — मोक्का,खुनाचा प्रयत्न, पोक्सो,जबरी चोरी असे १७ गुन्हे दाखल २ वर्षांसाठी हद्दपार असतानाही फरार, ​सचिन राजेंद्र खाडे (वय ३०, रा.अमानवस्ती,तीनखडी, ता. पाथर्डी) खुनाचा प्रयत्न व चोरीचे गुन्हे दाखल,​अनिकेत दिलीप पटारे (वय २२, रा. धामोरी,ता.नेवासा) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ​२ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला असून ​२ गावठी कट्टे व २ जिवंत काडतुसे, ​३ मोबाईल फोन, ​विना क्रमांकाची पल्सर मोटारसायकल असा एकूण २ लाख २४,०००/ रू. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,पोसई.अनंत सालगुडे तसेच अंमलदार गणेश लोंढे,बाळासाहेब नागरगोजे,फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड,विशाल तनपुरे,सागर ससाणे,प्रशांत राठोड आणि महादेव भांड यांच्या पथकाने केली. आरोपींविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट व मपोका कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 रक्ताचा सडा पाडण्याआधीच गेम ओव्हर! चांदबिबी महालावर गावठी कट्टे रोखून बसलेला मोक्यातील कुख्यात  आरोपी 'लखन' गजाआड; थरारक पाठलाग करू...

 रक्ताचा सडा पाडण्याआधीच गेम ओव्हर! चांदबिबी महालावर गावठी कट्टे रोखून बसलेला मोक्यातील कुख्यात  आरोपी 'लखन' गजाआड; थरारक पाठलाग करून एल.सी.बि.ने आवळल्या मुसक्या!


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

​अहिल्यानगर :- ऐतिहासिक चांदबिबी महाल परिसरात गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसांसह दबा धरून बसलेल्या गुन्हेगारांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या आहेत.तब्बल १७ गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला, ‘मोक्का’ कायद्यांतर्गत आणि अनेक गुन्ह्यांत फरार असलेला कुख्यात गुन्हेगार लक्ष्मण उर्फ लखन कासार अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.अहिल्यानगर-पाथर्डी रस्त्यावरील चांदबिबी महालाजवळील सर्कलवर विना क्रमांकाच्या पल्सर मोटारसायकलजवळ काही संशयित हत्यारांची विक्री करण्यासाठी उभे असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिसांनी पंचांसमक्ष सापळा रचताच संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला.मात्र, पथकाने पाठलाग करून तिघांनाही जमिनीवर झोपवून बेड्या ठोकल्या.​​लक्ष्मण उर्फ लखन बाबासाहेब कासार (वय २९,रा. कासारवाडी,ता.पाथर्डी) — मोक्का,खुनाचा प्रयत्न, पोक्सो,जबरी चोरी असे १७ गुन्हे दाखल २ वर्षांसाठी हद्दपार असतानाही फरार,

​सचिन राजेंद्र खाडे (वय ३०, रा.अमानवस्ती,तीनखडी, ता. पाथर्डी) खुनाचा प्रयत्न व चोरीचे गुन्हे दाखल,​अनिकेत दिलीप पटारे (वय २२, रा. धामोरी,ता.नेवासा) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 

​२ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला असून ​२ गावठी कट्टे व २ जिवंत काडतुसे,

​३ मोबाईल फोन,

​विना क्रमांकाची पल्सर मोटारसायकल असा एकूण 

 २ लाख २४,०००/ रू. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,पोसई.अनंत सालगुडे तसेच अंमलदार गणेश लोंढे,बाळासाहेब नागरगोजे,फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड,विशाल तनपुरे,सागर ससाणे,प्रशांत राठोड आणि महादेव भांड यांच्या पथकाने केली. आरोपींविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट व मपोका कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments