राज्यस्तरीय आंतर-जिल्हा महिला फुटबॉल स्पर्धेत पालघरने सोलापूरला पराभूत केले जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव येथील वेस्ट...
राज्यस्तरीय आंतर-जिल्हा महिला फुटबॉल स्पर्धेत पालघरने सोलापूरला पराभूत केले
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव येथील वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे सौजन्याने जिल्हा फुटबॉल असोसिएशन ने आयोजित केलेली राज्यस्तरीय आंतर-जिल्हा महिला फुटबॉल स्पर्धा गेल्या तीन दिवसांपासून जळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात सुरू आहे. रविवार, २३ ऑगस्ट रोजी झालेल्या एका रोमांचक सामन्यात गोलचा वर्षाव झाला. पालघर संघाने दमदार कामगिरी करत सोलापूरला १४-० ने पराभूत केले आणि स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला.
उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये,
पालघरने सोलापूरला १४-० ने,
वर्धाने नंदुरबारला ४-२ ने,
ठाण्याने संभाजीनगरला ७-१ ने,
कोल्हापूरने बुलढाण्याला २-० ने पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
उत्कृष्ट खेळाडूंचा सन्मान
या सामन्यांमध्ये अपवादात्मक कामगिरी करणाऱ्या एमी टँक (पालघर), इच्छा रंगारी (वर्धा), सना कोटियन (ठाणे) आणि सानिका भोसले (कोल्हापूर) यांना उत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख, विश्व कांस्यपदक विजेती कॅरमपटू आयेशा खान, पोलीस क्रीडा विभागाचे प्रमुख संतोष सुरवाडे, खलील अहमद, प्रा. डॉ. प्रणव बेलोरकर, मध्य रेल्वेचे फुटबॉलपटू उज्ज्वल काळे, अखिल भारतीय हॉकीपटू अकील शेख आणि मतीन पटेल यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
स्पर्धेदरम्यान खेळाडूंसाठी उत्कृष्ट सुविधा फिजिओथेरपी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डॉ. पूर्वा तिवारी, डॉ. सुमेधा भावसार, डॉ. सानिका वाघमोडे, डॉ. नयन शेटे, डॉ. सलोनी कीर, डॉ. आशिष पाटील, डॉ. वैष्णवी शेलार, डॉ. यश देवरे, डॉ. अंशिता वर्मा आणि डॉ. विशाल दुर्वे हे खेळाडूंना आपली सेवा देत आहेत.
फोटो कॅप्शन: जळगाव येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय आंतर-जिल्हा महिला फुटबॉल स्पर्धेत पालघरच्या एमी टँकचा सत्कार करताना आयेशा खान, फारुख शेख आणि डॉ. अनिता कोल्हे दिसत आहेत.

No comments