NCC CATC कॅम्पसाठी जे. ई. स्कूल व ज्यु. कॉलेज मुक्ताईनगर चे 70 विद्यार्थी भुसावळकडे रवाना प्रा. सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकां...
NCC CATC कॅम्पसाठी जे. ई. स्कूल व ज्यु. कॉलेज मुक्ताईनगर चे 70 विद्यार्थी भुसावळकडे रवाना
प्रा. सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर : राष्ट्रीय छात्र सेना (NCC) अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या CATC -115 कॅम्प मध्ये सहभागी होण्यासाठी
जे. ई. स्कूल व ज्यु. कॉलेज चे 70 कॅडेट्स प्राचार्य व्ही. एम. चौधरी , मनोज चौधरी (SO) व तुषार वराडे (CTO) यांच्या मार्गदर्शनात उत्साहात भुसावळ येथे रवाना झाले.
कॅम्पसाठी रवाना होताना विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण होते. 18 महाराष्ट्र बटालियन जळगाव चे कमांडिंग ऑफिसर धीरज मिल्होत्रा यांच्या मार्गदर्शनात आर पी डी भुसावळ येथे दि. 21 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट मध्ये चालणाऱ्या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना शिस्त, नेतृत्वगुण, साहस, व्यक्तिमत्त्व विकास,विविध लष्करी प्रशिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. तसेच परेड, शस्त्र हाताळणी, मैदानी प्रशिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
सदर प्रशिक्षणा साठी संस्थेच्या चेअरमन रोहिणी खडसे, उपाध्यक्ष नारायण चौधरी, सचिव डॉ. सी एस चौधरी, सर्व संचालक मंडळ,प्राचार्य व्ही. एम. चौधरी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांच्याकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments