adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जे.ई.स्कूल मुक्ताईनगर येथे बहिणाबाई चौधरी जयंती उत्साहात साजरी

जे. ई. स्कूल मुक्ताईनगर येथे बहिणाबाई चौधरी जयंती उत्साहात साजरी  प्रा. सतीश गायकवाड | मुक्ताईनगर (संपादक : हेमकांत गायकवाड) मुक्ताईनगर य...

जे. ई. स्कूल मुक्ताईनगर येथे बहिणाबाई चौधरी जयंती उत्साहात साजरी 

प्रा. सतीश गायकवाड | मुक्ताईनगर
(संपादक : हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर येथील जे. ई. स्कूलमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पणाने करण्यात आली.

यावेळी पी. एस. बढे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनकार्याबरोबरच त्यांच्या साहित्यिक योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी बहिणाबाईंच्या प्रसिद्ध कवितांचे काव्यवाचन करून त्यांच्या साहित्याची ओळख करून दिली.

कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एम. चौधरी, उपमुख्याध्यापिका व्ही. के. शिर्के, पर्यवेक्षक व्ही. डी. बऱ्हाटे, के. आर. कवळे, एस. एम. वाढे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

आर. व्ही. महाजन तसेच वाय. एस. पाटील यांनी बहिणाबाईंच्या भावस्पर्शी कविता वाचून दाखवत त्यांच्या कवितांमधून ग्रामीण जीवनातील अनुभव, निसर्ग, कष्ट आणि मानवी भावभावनांचे सुंदर चित्रण विद्यार्थ्यांसमोर मांडले.

बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यामध्ये ग्रामीण जीवनाचे वास्तव, निसर्गाशी असलेले नाते, कष्टकरी माणसांचे जीवन आणि मानवी भावविश्व यांचे अत्यंत प्रभावी चित्रण आढळते, असे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्याचा अधिकाधिक अभ्यास करावा, असे आवाहन करण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments