adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शासकीय वसतिगृह योजनेसह स्वयंम व आधार योजनेसाठी 15 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 शासकीय वसतिगृह योजनेसह स्वयंम व आधार योजनेसाठी   15 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन   काल्पनिक फाईल फोटो  श्रीरामपूर प्रतिनिधी (संपादक ...

 शासकीय वसतिगृह योजनेसह स्वयंम व आधार योजनेसाठी 15 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन  

काल्पनिक फाईल फोटो 

श्रीरामपूर प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश अर्ज करण्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. या योजनांसाठी १२ वी नंतरच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी पात्र विद्यार्थ्यांनी 15 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शासनाच्या https://hmasnew.mahait.org या ऑनलाइन संकेतस्थळावर लवकरात लवकर अर्ज भरावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, अहिल्यानगरचे सहायक संचालक विनोद लोंढे यांनी केले आहे.

----------------------------------------------

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर 9561174111

No comments