अहिल्यानगर जिल्हा कारागृहात ध्वज दिन उत्साहात साजरा श्रीरामपूर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) कारागृह विभागाच्या " सुधारणा व ...
अहिल्यानगर जिल्हा कारागृहात ध्वज दिन उत्साहात साजरा
श्रीरामपूर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
कारागृह विभागाच्या " सुधारणा व पुनर्वसन " या ब्रीद वाक्याचा उद्देश साध्य होण्याच्या दृष्टीने अहिल्यानगर जिल्हा कारागृह प्रशासनामार्फत बंद्यांसाठी वेळोवेळी विविध सण, उत्सव, सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनात्मक व मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्यानुसार 1 सप्टेंबर रोजी कारागृह विभागाचे ध्वज दिनाचे औचित्य साधुन अहिल्यानगर जिल्हा कारागृह व आर्ट ऑफ लिव्हींग, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर जिल्हा कारागृहातील बंद्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी, बंद्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत व्हावी आणि त्यांचे मनपरिवर्तन व्हावे, याकरीता देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कारागृह अधीक्षक संतोष कवार यांनी कारागृहातील बंद्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून परावृत्त होणेसाठी, तसेच बंद्यांच्या मनामध्ये देशभक्ती जागृत होण्यासाठी व त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची अत्यंत गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमास आर्ट ऑफ लिव्हींग, अहिल्यानगरचे सुभाष गड्डम हे देखील उपस्थित होते. गायक व गिटार वादक गिरीराज जाधव, पियानोवादक नरेंद्र साळवे तसेच तबला वादक सार्थक डावरे यांनी हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यावेळी सुमधुर देशभक्तीपर गीत तसेच भक्तीगीतांचे सादरीकरण करण्यात आले. सदर कार्यक्रमात सर्व बंद्यांनी सहभाग नोंदवत कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
----------------------------------------------
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
No comments