महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त 2 ऑक्टोंबर रोजी फैजपूर, रावेर व यावल येथे प्रभातफेरी इदू पिंजारी फैजपूर (संपादक : हेमकांत ग...
महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त 2 ऑक्टोंबर रोजी फैजपूर, रावेर व यावल येथे प्रभातफेरी
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी फैजपूर, रावेर आणि यावल शहरात सकाळी ७.३० वाजता प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
महात्मा गांधींचे सत्य, अहिंसा, सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक सलोख्याचे विचार तसेच लाल बहादूर शास्त्री यांचा साधेपणा, राष्ट्रनिष्ठा आणि ‘जय जवान, जय किसान’ हा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या प्रभातफेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित शहरांतील गांधी-शास्त्री विचारांवर श्रद्धा असलेल्या नागरिकांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
फैजपूर : सकाळी ७.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एकत्रीकरण होईल. पुतळ्यास अभिवादन करून प्रभातफेरीस सुरुवात होईल. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला अभिवादन करून छत्री चौक येथील स्वातंत्र्य स्मारकाजवळ प्रभातफेरीचा समारोप होईल.
रावेर : सकाळी ७.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एकत्रीकरण होईल. अभिवादनानंतर प्रभातफेरी मुख्य बाजारपेठेतून महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत जाईल. तेथे गांधीजींना अभिवादन करून समारोप करण्यात येईल.
यावल : सकाळी ७.३० वाजता बोरावल गेट येथे एकत्रीकरण होईल. येथून प्रभातफेरीस सुरुवात होऊन मुख्य बाजारपेठेतून बुरुज चौकापर्यंत मार्गक्रमण करण्यात येईल. बुरुज चौकात प्रभातफेरीचा समारोप होईल.
फैजपूर, रावेर आणि यावल शहरांसह परिसरातील नागरिक, युवक-युवती, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सत्य, अहिंसा, शांतता, सद्भावना आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी या प्रभातफेरीत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments